
जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।
जळगाव शहरातील नेहरू चौकातील एका दुकाना बाहेर लावलेली दुचाकी अवघ्या तीन तासात अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी शिवारात असलेल्या वैष्ण्वी पार्क मधील रहिवासी देवमन शामराव मोरे (वय ५१) हे दि १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास नेहरू चौकात कामानिमित आले असता. त्यांनी नेहरू चौकातील एका दुकानाबाहेर आपली दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.के.२६६७ हि २० हजार रुपये किमतीची दुचाकी पार्क करून कामानिमित्त बाहेर गेले होते. तीन तासात याठीकानाहून अनोळखी चोरट्यांनी दुचाकी लंपास केली आहे. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना.प्रफुल्ल धांडे हे करीत आहेत.





















