जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२२
राज्यात हिवाळ्याच्या थंडीने जरी जनतेला वेठीस धरले असले तरी सोन्याच्या भावाने मात्र चांगलाच घाम फोडला आहे. आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. कधी सोने महाग तर कधी भाव घसरलेले दिसत आहे. गेल्या दोन दिवसापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली तर आज शनिवारलाही सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. वीकेंड असल्याने ही वाढ अपेक्षित होती. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेट साठी 54,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम
चांदीचा दर 676 रुपये आहे.
चेन्नई – 55,060 रुपये
दिल्ली – 54,440 रुपये
हैदराबाद – 54,280 रुपये
कोलकत्ता – 54,280 रुपये
लखनऊ -54,440 रुपये
मुंबई – 54,280 रुपये
नागपूर – 54,280 रुपये
पुणे – 54,280 रुपये
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.