
जळगाव मिरर । २ डिसेंबर २०२२
शहरातील हिरा-गौरी पार्क येथील रहिवासी असलेले यांची वारवार फोन करीत त्यांच्या खात्यातून तब्बल १ लाख १२ हजार रुपये फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गु गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार असे कि, शहरातील खोटे नगर परिसरातील हिरागौरी पार्क येथील ५९ वर्षीय किशोर दत्तात्रय रासने हे दि १ रोजी घरी असतांना त्यांना अनोळखी नंबरहून अभिषेक शर्मा या व्यक्तीचा फोन आला कोणतीही ओळख नसताना त्यांच्याशी वारवार बोलून विश्वास संपादन करीत क्विक सपोर्ट डाऊनलोड करण्यास सांगून तुमचे इलेट्रिक बिल अपडेट नसल्याचे भासवून दोन खात्यामधून वेळोवेळी १ लाख १२ हजार २२४ रुपये काढून घेत फिर्यादी रासने यांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण पाटील हे करीत आहेत.