जळगाव मिरर | ३१ मे २०२३
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या एका वाटर पार्कमध्ये शुटींग करीत असल्याच्या शुल्लक कारणाने पार्कमधील काही कर्मचारीनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाने एमआयडीसी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जळगाव जिल्ह्यात कडाक्याचे उन पडत आहे. त्यामुळे अनेक तरुण शहरानजीक असलेल्या झुलेलाल वाटर पार्क परिसरात जात आहेत. याठिकाणी आर्यन प्रितेश भावसार (वय-१९, रा. भवानी पेठ, आठवडे बाजार, जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह सोमवारी २९ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास झुलेलाल वाटर पार्क फिरण्यासाठी आले होते. फिरत असताना कपडे बदलत असतांना शुटींग करत आहे या संशयावरून आर्यन भावसार याला येथील काम करणारे अनोळखी ४ कर्मचाऱ्यांनी जाब न विचारता थेट त्याला मारहाण करून त्याचा कॅमेरा फेकून दिला. तसेच त्याच्या सोबत असलेले महिला व मुलींना देखील शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर आर्यन भावसार याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाटरपार्क येथे काम करणाऱ्या अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.