
जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२३
जगातील रशिया या देशानेही लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती मोहीम अपयशी ठरली. अशात भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे. अवघ्या देशाचे लक्ष या भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे लागलं होते. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचं विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग झाले आहे. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.
दक्षिण अफ्रिकेत ब्रिक्स संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतांना त्यांनी तिथून इस्रोच्या या मोहिमेत व्हर्चुअली उपस्थिती लावली आहे. भारत लवकरच इतिहास रचणार आहे. त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ते या मोहिमेत व्हर्चुअली सहभागी झाले आहेत. भारताच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा पाहण्यास मिळतो आहे. कारण भारताचं चांद्रयान हे चंद्रावर अत्यंत यशस्वीपणे उतरलं आहे. भारताचा झेंडा आता तिथे पाहण्यास मिळतो आहे. इस्रोला मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.