जळगाव मिरर | २ जून २०२५
दैनिक अहिल्याराज व हिंदी मराठी पत्रकार संघ पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती व दैनिक अहिल्या राज वर्धापन दिवस निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन एक्सएलन्स अवार्ड 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
बांबरूड राणिचे येथील आदर्श युवा शेतकरी किरण अशोक सुर्यवंशी यांचे कला शाखेतुन डी.एड झाले असुन नोकरीची आस न धरता शेती क्षेत्रातील आवड असल्याने शेती मध्ये नवीन प्रयोग करून उत्पादन वाढवत आहे,शेती पारंपारिक पध्दती न करता व्यावसायिक पध्दती करण्यासाठी प्रयत्नशील आहे किरण सुर्यवंशी यांची शेती करण्याच्या पद्धत व उत्तम कार्य पध्दती ची दैनिक अहिल्याराज साप्ताहिक व हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या कार्यवाही दखल घेऊन पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील आदर्श युवा शेतकरी किरण अशोक सुर्यवंशी यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते “उत्कृष्ट युवा शेतकरी” पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले,
सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते. त्यावेळी ७०० प्रस्तावांपैकी निवड करून २६० मान्यवरांना “इंडियन एक्सलन्स पुरस्कार २०२५ “प्रदान करण्यात आला.
इंडियन एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजूभाऊ काजळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निलेश तायडे सहा माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई, संदीप काळे ठाणेदार मलकापूर ग्रामीण, भाई अशांत वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ, प्रसादभाऊ जाधव राष्ट्रवादी जिल्हा ऊपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक, प्रा. डॉ. अनिल खर्चे सर प्राचार्य इंजिनिअरिंग व्ही. भी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज, फारुख शेख ज्येष्ठ पत्रकार लोकमत व इतर पत्रकार उपस्थित होते.
