
धरणगाव : विनोद रोकडे
धरणगांव : येथील संत सावता माळी समाजाच्या सभागृहात संविधान दिनाचे औचित्य साधत माळी समाजातील गुणवंतांचा शाल, पुष्पगुच्छ व ” भारतीय संविधान ” हा अनमोल ग्रंथ मान्यवरांचा हस्ते देवून गुणगौरव करण्यात आला.
सत्कारार्थी म्हणून तिरंगा अकॅडमीचे प्रमुख समाधान महाजन, जोत्सना माळी, स्नेहल महाजन यांचा समावेश होता. गुणगौरव सोहळा प्रसंगी समाधान महाजन यांनी आपल्या मनोगतातून म्हणाले की, मान्यवरांनी आमचा सन्मान केला, आमची जबाबदारी वाढली व शाबासकीची – कौतुकाची थाप व आशिर्वाद आम्हाला नेहमी ऊर्जा देतील असे प्रतिपादन समाधान महाजन यांनी केले.
याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, शिवाजीराव देशमुख, सचिव राजेंद्र मांगो महाजन, सहसचिव दिगंबर महाजन, कडू महाजन, ज्ञानेश्वर महाजन, दशरथ बापू महाजन, विजय महाजन, रामनाथ माळी, भगवान तायडे, महेंद्र भैय्या महाजन, विलास माळी, रवि महाजन, भिका माळी, कांतीलाल माळी, राजु माळी यासह जेष्ठ मान्यवर सुखदेव महाजन, रावा महाजन, संजय महाजन, पी.डी.पाटील, पी.डी.महाजन, एच.डी.माळी, दिनेश महाजन, कैलास महाजन, गोरख देशमुख यांच्यासह समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.टी.माळी यांनी तर आभार माळी गोपाल माळी यांनी मानले.




















