जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतांना एक धक्कादायक घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून पीडित मुलगी ८ महिन्यांची गरोदर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात नववीत शिकणाऱ्या मुलीवर धमकी देऊन वारंवार अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी आठ महिन्यांची गरोदर झाल्यानंतर हा प्रसंग उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या या पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात अत्याचार करणारा आरोपी फरार आहे. पोलीसांकडून आरोपीचा पोलीसांकडून शोध सुरू आहे. दोघांविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.