
जळगाव मिरर | १३ मे २०२४
जळगाव लोकसभेसाठी आज दि.१३ मे रोजी सकाळपासून मतदान सुरु झाले असून शहरातील प्रत्येक मतदार केंद्रावर नागरिकांची गर्दी देखील दिसत आहे. तर अनेक ठिकाणी वृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यत आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहे. यात शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात वृद्ध नागरिकांना मतदान केंद्रात आणण्यासाठी विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अनेक मतदान केंद्रांवर वृद्ध मतदारांनासामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली यामध्ये मेहरुण रामेश्वर कॉलनी भागांमध्ये विचार वारसा फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांवर जाऊन वृद्ध व अपंग मतदारांना ने आण करण्यासाठी मदत केली यामध्ये फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपूत ऋषी राजपूत,आकाश तोमर,मयुर डांगे,संकेत म्हस्कर,चेतन राजपूत, राहुल राजपूत, नकुल निकम, अक्षय गवई,आदींनी मदत केली.