जळगाव मिरर | ७ मार्च २०२५
दिनांक 07 मार्च 2025 शुक्रवार रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, मानवता कॅन्सर सेंटर नाशिक, रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
तपासणीसाठी मानवता कॅन्सर सेंटर नासिक डॉक्टरांची टीम लाभली.हे शिबीर 7 मार्च शुक्रवार रोजी सकाळीं 8 ते 3 या वेळेत रोटरी हॉल मायादेवी नगर येथे संपन्न झाले या शिबिरात ब्रेस्ट इन्वेस्टीगेशन, पॅप्समीयर, ओरल स्क्रीनिंग बी पी, शुगर ,ECG हृदयरोग आयुर्वेद मेंदू मणका इत्यादीची तपासणी करण्यात येऊन यावर मोफत योग्य ते मार्गदर्शन व सल्ला महिला रुग्णांना देण्यात आला. एचडी मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ रश्मी बोंडे आणि संपूर्ण टीम सोबतजळगाव येथून डॉ गोपाल घोलप न्युरॉलॉजिस्ट, डॉ भाग्यश्री सूर्यवंशी डेंटिस्ट, कर्करोग कॅन्सर साठी डॉ रोशनी मॅडम स्त्री रोग तज्ञ डॉ योगिता पाटील मॅडम ऑर्थोपेडिक डॉ शौनक पाटील जनरल मेडिसिन साठी डॉ गजानन परखड मुळव्याध फिशर आणि भगंदर विभाग डॉ मनोज पाटील जनरल चेकअप साठी डॉ प्रियंका बोरसे नाशिक इत्यादी डॉक्टरांनी उपस्थित राहून सेवा दिली. या शिबिराचा लाभ 300महिलांनी घेतला.
60 ईसीजी ८४ पॅप्समेअर 50 ओरल ओरल स्क्रीनिंग झाली यात प्रमुख अतिथी खासदार लोकसभा मतदारसंघ मा स्मिताताई उदय वाघ, माजी महापौर मा विष्णूभाऊ भंगाळे, आमदार जळगाव शहर मा राजू मामा भोळे, श्री जे बी पाटील एक्स कमिशनर डॉ धनंजय बेंद्रे वरिष्ठ जिल्हा समन्वयक रेड स्वस्तिक सोसायटी , डॉ राजेश दाबी,नरेश चौधरी,कविता झाल्टे , संदीप केदार दिलीप गवळी , नंदूभाऊ रायगडे, सत्यनारायण खटोड , डॉ प्रमोद आमोदकर, डॉ एस एस पाटील ,आनंद मराठे, ज्ञानदीप पाटील ,कुंदन काळे,इ. प्रमुख अतिथीच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी राहुल सूर्यवंशी सिनियर मॅनेजर एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिक यांनी मानवता कॅन्सर सेंटरच्या कूपनसह काही कर्करोग संबंधित सरकारी योजनाबद्दल महत्त्वाची माहिती सांगितली. भव्य महाआरोग्य शिबिराचे प्रास्ताविक मनीषा पाटील यांनी केले. याप्रसंगी शिबिराचे लाभार्थी नासिर शेख महाबळ सी ए ऑपरेट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.रेड स्वस्तिक महाव्यवस्थापक माननीय टी एस भाल साहेब, रेड स्वस्तिक सह महाव्यवस्थापक अशोक जी शिंदे व रेड स्वस्तिक चे जळगाव चेअरमन एडवोकेट राजेश झाल्टे यांचे सह रेड स्वस्तिक सोसायटीच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.हे शिबिर खास महिलांसाठी मोफत आयोजित करण्यात आले होते.मानवता कॅन्सर सेंटरच्या सर्व उपस्थित डॉक्टर टीमचा यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उत्कृष्ट कार्यकर्ती पुरस्कार 2025 या पुरस्काराने किमया पाटील व नेहा जगताप यांना सन्मानित करण्यात आले.
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या. सुत्रसंचलन सचिव ज्योती राणे व सुप्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे यांनी केलें व आभार नूतन तासखेडकर यांनी मानले. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी मंजुषा अडावदकर आशा मौर्य संगीता चौधरी शिल्पा बयास रेणुका हिंगु किमया पाटील नीता विसावे, राधिका पाटील, नेहा जगताप, हर्षाली तिवारी, हर्षा गुजराती, नूतनतास खेडकर, माधुरी शिंपी, श्रावणी पाटील इत्यादी उपस्थित होत्या