जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२३
जगभरात होत असलेल्या महागाई व सध्या इस्राइल-हमास युद्धाचा परिणाम भारतातील महागाईवर दिसून येत आहे. भारतात पेट्रोल-डिझेल वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इस्राइल-पॅलेस्टाईनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. त्याचा परिणाम भारतातील अनेक गोष्टींवर दिसून येत आहे.
इस्राइल-पॅलेस्टाईनमध्ये तेलाचे साठे नाहीत परंतु, इराण हा सर्वाधिक तेल पुरवठा करणारा देश आहे. अशातच इराणने पॅलेस्टाईन आणि हमासला पाठिंबा जाहीर केला आहे. इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद काही प्रमाणात भारतात दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा महागाईचा चटका सर्वसामान्यांना सोसावा लागणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. आज ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $ 0.33 किंवा 0.37 टक्क्यांनी घसरून $ 87.82 प्रति बॅरल झाला आणि WTI क्रूडचा दर प्रति बॅरल $ 0.35 किंवा 0.41 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $ 86.03 झाला आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. परंतु, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपयांनी विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल-डिझेलचे भाव जैसे थे च आहे.
पुण्यात पेट्रोल १०६.४७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.९७ रुपयांनी विकलं जातंय. पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काही पैशांनी वाढ झाली
ठाण्यात पेट्रोलचा आजचा भाव १०५.७७ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२. ९७ रुपयांनी विकलं जाईल. पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये काही पैशांनी आज घसरण पाहायला मिळाली आहे.
नागपूरमध्ये पेट्रोल १०६. ४२ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.९६ रुपये मोजावे लागतील.