जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
गेल्या वर्षभारत जळगाव जिल्ह्यातील एसीबीने अनेक लाचखोराना बेड्या ठोकल्या आहेत. जिल्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2024 मध्ये वर्ग १ चे ४, वर्ग २ चे १, वर्ग ३ चे ३०, वर्ग ४ चे ६, इतर लोकसेवक ६ व खाजगी इसम १३ अशा अधिकारी, कर्मचारी व खाजगी इसम अशा एकुण ६० लाच घेणाऱ्या व्यक्तींवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2024 मध्ये लाच घेणाऱ्या व लाच मागणाऱ्या अशा 37 कारवाई मध्ये 60 जणांवर लाच घेण्याप्रकरणी विविध कलमानन्वे गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये वर्षभरात महसुल विभागात ७ कारवाई मध्ये ११, जिल्हापरिषद विभागात ७ कारवाई मध्ये १४ संशयित आरोपी, पोलीस विभागात ५ कारवाई मध्ये ८, विज वितरण विभागात ४ कारवाई मध्ये ८, उद्योग उर्जा व कामगार विभागात २ कारवाई मध्ये २, शिक्षण विभागात २ कारवाई मध्ये २, सरपंच २ कारवाई मध्ये ५, इतर लोकसेवक २ कारवाई मध्ये २, खाजगी २ कारवाई मध्ये २ इसम, आर.टी.ओ विभागात १ कारवाई मध्ये २ संशयित, दारुबंदी विभाग १ कारवाई मध्ये २, म.न.पा. विभागात १ कारवाई मध्ये १, बी.एच.आर.पतसंस्था १ कारवाई मध्ये २ आरोपी अशा विविध विभागात कारवाई केली आहे.
सन २०२३ च्या मध्ये ३२ गुन्हयांमध्ये ५१ आरोपीतांवर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली आहे. सन २०२३ च्या तुलनेत सन २०२४ मध्ये अधिक ०५ ने वाढ झाली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, यांचे मार्गदर्शनाखाली डी. वाय. एस. पी. योगेश ठाकूर व व त्यांच्या अधिकारी व आमदार यांनी केली आहे. जळगांव युनिट तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी. जनतेच्या सोईच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार करण्यासाठी लॅन्डलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली आहे.
