जळगाव मिरर | १ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरातील ३३ वर्षीय विवाहितेचा पती नोकरीच्या ठिकाणी गेलेले होते तर मुले क्लासेसमध्ये असतांना विवाहितेने घरी एकटी असतांना गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिद्धीविनायक कॉलनीमध्ये शशिकांत कासोट हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शशिकांत कासोट हे कामावर गेले होते, तर त्यांचे मुल ही क्लासला गेलेले होते. यावेळी सीमा शशिकांत कासोट (वय ३३) या घरी एकट्याच होत्या. त्यांनी घरात कोणीही नसल्यामुळे ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळच्या सुमारास त्यांची मुले क्लासमधून घरी आले तर घराचा दरवाजा आतून लावलेला होता. मुलांनी बराच वेळ आवाज दिला तर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना सांगितले. त्यांनी दरवाजा उघडताच त्यांना सीमा कासोट या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या.
आईचा मृतदेह बघताच मुलांचा आक्रोश आपल्या आईचा मृतदेह बघताच कासोट यांच्या मुलांनी एकच आक्रोश केला. त्यांनी घटनेची माहिती आपल्या वडीलांना दिली. त्यांनी लागलीच घराकडे धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट सीमा कासोट यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली. त्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.