जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर होणाऱ्या बदनामीच्या घटनेत कमालीची वाढ होत असताना दिसत आहे. नुकतेच जळगाव जिल्ह्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेचा फोटो एकाने स्वताच्या फेसबुकवर टाकून बदनामी केल्याप्रकरणी महिलेने जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेचा फोटो सुनील अनोळखी इसमाने महिलेचा फोटो फेसबुकवर ओळख नसताना सदर व्यक्तीने महिलेचा फोटो वापरून तिची बदनामी केल्याप्रकरणी दि.२८ सप्टेंबर रोजी ते शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी महिलेने जळगाव सायबर पोलिस स्थानकात धाव घेत फिर्याद दिली असून बदनामी करणाऱ्या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.