• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

जळगावातील डॉ.बाविस्करांचा देशभरात डंका !

‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु - नेत्रचिकित्सा’ या पदावर झाली नियुक्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2023
in आरोग्य, जळगाव, जळगाव ग्रामीण, देश-विदेश, सामाजिक
0
जळगावातील डॉ.बाविस्करांचा देशभरात डंका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ मार्च २०२३ ।

जगभरात अनादी काळापासून भारतीय आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती गाजत आहे. ज्याचा उल्लेख आपल्या पवित्र ग्रंथांत देखील आहे. आयुर्वेदाला पुन्हा एकदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने सन 1984 मध्ये राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाची स्थापना केली. सध्या हे विद्यापीठ भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाशी संबंधित असलेले डॉ.हेमकांत ऊर्फ हेमंत शिवाजीराव बाविस्कर हे देशातील तीन नेत्रतज्ज्ञ पैकी एक ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत. त्यामुळे देशभरात आज जळगावातील डॉ.हेमकांत ऊर्फ हेमंत शिवाजीराव बाविस्कर यांचा डंका वाजू लागला आहे. गत 17 फेब्रुवारी रोजी त्यांना विद्यापीठाने ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ म्हणून नियुक्त केले आहे.

पुढे माहिती देताना आयुर्वेद नेत्रतज्ज्ञ डॉ.बाविस्कर म्हणाले की, यापैकीच एक म्हणजे डोळ्यांचे आजारांसाठी ते स्वत: आणि केरळ येथील नारायण नंबूदिरीपाद हे संपूर्ण देशात राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मान्यताप्राप्त आयुर्वेद नेत्रतज्ज्ञ आहेत. डॉ.बाविस्कर हे गेल्या 26 वर्षांपासून आयुर्वेदातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषत: डोळ्यांच्या विकारांवर यशस्वीरित्या उपचार करीत आहेत. त्यांनी सांगितले की, डोळ्यांशी निगडित आजार जसे काचबिंदू (ग्लुकोमा), डोळे कोरडे पडणे (ड्राय आय सिंड्रोम), डोळ्यांना वारंवार सूज येणे (युव्हायटिस), लहान मुलांच्या डोळ्यांच्या नंबरमध्ये सतत होणारी वाढ (प्रोग्रेसिव्ह मायोपिया) तसेच मधुमेह (डायबिटीज) मुळे डोळ्यांवर होणार्‍या परिणामांवर ते आयुर्वेदाच्या माध्यमातून यशस्वी उपचार करत आहेत. त्यांच्या मते, आयटी क्षेत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या वाढत्या वापरामुळे ड्राय आय सिंड्रोमची समस्या सर्वदूर होत आहे. ज्यावर आयुर्वेद चिकित्सा पद्धतीद्वारे औषधोपचार करता येतो.
आयुष डिपार्टमेंटविषयी माहिती देताना डॉ.बाविस्कर म्हणाले की, सध्या फक्त दिल्ली आणि गोवा येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए) स्थापन करण्यात आले आहे. भारत सरकारकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ची निवड केली जाते. त्याअंतर्गत यावर्षीही निवडप्रक्रियेत राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात डॉ.बाविस्कर यांनी केलेल्या अर्जानुसार राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ संचालक समितीतर्फे डॉ.गुप्ता व डॉ.हरिष सिंग यांनी जळगावात येऊन त्यांचे वैद्यकीय कार्य, आयुर्वेदातील संशोधन व आयुर्वेदासाठी असेलेली सामाजिक जाणीव लक्षात घेऊन त्यांना नामनिर्देशित करुन आर.ए.व्ही.मार्फत त्यांची नियुक्ती केली. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाद्वारे नामांकित ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ अंतर्गत 2 निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविले जात असते. ज्यामध्ये विद्यार्थी शिक्षणासोबतच, प्रॅक्टीस करुन त्यांचा प्रबंध ही पूर्ण करतात. ज्याचे सादरीकरण राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयुष मंत्रालयाकडून फेलोशिप प्रदान केली जाते. यावर्षीही देशभरातील 213 आयुर्वेद विद्यार्थ्यांना ही फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. वर्ष 2022-23 या वर्षासाठी, देशातील तीन निवडक ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’पैकी दोन केरळ राज्यातील आहेत ज्यांच्या अंतर्गत 8 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे आणि महाराष्ट्रातील जळगाव येथील डॉ.हेमकांत बाविस्कर हे एकमेव नामांकित ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत ज्यांच्या अंतर्गत 2 निवडक विद्यार्थ्यांना परिविक्षेसाठी पाठविण्यात आले आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ लवकरच आयुर्वेदाच्या परिवीक्षाधीन विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा विचार करत आहे. आयुर्वेदात बीएएमएस, एमडी किंवा एमएस असलेले डॉक्टर या फेलोशिपसाठी अर्ज करु शकतात. परिविक्षा काळात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना स्टायपेंडही दिला जातो.

अ‍ॅलोपॅथी उपचारांसाठी ज्या पद्धतीने शासकीय अनुदान-सुविधा उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे आयुर्वेदातही व्हायला हवे यासाठीसुद्धा डॉ.बाविस्कर प्रयत्नशील आहेत. ते म्हणतात, त्यांना जळगावला आयुर्वेदात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित करायचे आहे. यासोबतच दिल्ली आणि गोवा व्यतिरिक्त जळगाव येथेही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए) स्थापन व्हावे, असे डॉ.बाविस्कर यांचे मत आहे. ते यासाठी प्रयत्नशील तर आहेतच, पण आयुर्वेदावरील संशोधन सुरु ठेवून त्याच्या प्रचारासाठी ते सदैव समर्पित आहेत.

Related Posts

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान
जळगाव

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
जळगाव

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!
क्राईम

भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!

April 1, 2026
marhan
क्राईम

किरकोळ वादातून दोन कुटुंबांत हाणामारी; लोखंडी पाइपने मारहाण, परस्परविरोधात गुन्हे दाखल !

April 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group