जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२४
बहिणाबाई महोत्सवास गुरुवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आमदार सुरेश भोळे यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, शाहीरी पोवाडा, देशभक्तीपर गीते, वहीगायन ,भावगीते , मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत. खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागर सखींचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली. आमदार सुरेश भोळे ,नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ताशेज जळगांव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, शैलेश मोरखडे, ,मनोहर पाटील, डाॅ.पी . आर चौधरी,अनिल कांकरीया, कुशल गांधी, पवन जैन, राजेश पाटील, नितीन सपके सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे, बाळासाहेब सुर्यवंशी, सचिन महाजन, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, स्वप्नील वाघ, आकाश भावसार, अभिषेक बोरसे, भगवान तिवारी, विक्रांत चौधरी, महेश पाटील यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.
विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली . स्थानिक कलाकारांना कलांचे सादरीकरण केले. उद्यापासून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले