जळगाव मिरर | १२ जुलै २०२५
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे दि.११ रोजी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांची पात्रता तपासण्यात यावी. व स्कूल व्हॅन चालकांचे पोलीस व्हेरीफिकेशन होण्याबाबत या विषयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शाळांची तपासणी केली जाते, मात्र त्या तपासणीत शिक्षकांची पात्रता, शाळेतील इतर कर्मचा-यांचे पोलीस व्हेरीफिकेशन व इतर आवश्यक बाबी तपासल्या जातात की नाही, याबाबत संशय निर्माण झाला आहे. आज रोजी जळगांव तालुक्यासह जिल्हातील बरेचश इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये शिक्षक हे पदवीधर नसल्याचे आमच्या निर्देशनास आले आहे. आणी शिक्षण संस्था चालक हे विनापदवीधर कर्मचारी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ५ ते १० हजार रुपये महिन्याने ठेवत गण असल्याचेही निर्देशनास आले आहे. तेच दुसरीकडे विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडुन या शाळा हजारो रुपये शैक्षिणक शुल्काच्या नावावर घेत असल्याचे दिसुन आले आहे.
संपुर्ण जिल्हातील इंग्रजी माध्यमाच्याखाजगी शाळामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारे कर्मचारी यांचे देखील शैक्षिणक पात्रता तपासण्यात यावी. तसेच शिक्षकेत्तर व इतर कर्मचा-यांचे पोलीस व्हेरीफिकेशन करून त्यांची शैक्षिणक पात्रता तपासण्याची गरज आहे. सर्व खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी स्वतंत्र व विशेष समिती नेमण्यात यावी. तरी आपणास नम्र विनंती आहे की, या कार्यावाहीव्दारे जिल्हातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सुरक्षित शिक्षण मिळले, अशी अपेक्षा आहे.
यांची होती उपस्थिती
मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, महानगर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, सागर शिंपी, दीपक राठोड, किशोर खलसे, गणेश नेरकर, दिनेश पाटील, अरुण गव्हाणे, अविनाश पाटील, दिवेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
