
जळगाव मिरर | २० मार्च २०२६
जळगाव शहरापासून नजीक असलेल्या निमखेडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरुन दिपाली नितीन सोनवणे (वय ३०, रा. निमखेडी, ता. जळगाव) या विवाहितेचा तीच्या पतीने विळ्याने वार करीत निघुण खून केला. त्यानंतर संशयित नितीन विजय सोनवणे (वय ३८) हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होवून त्याने पोलिसांना आपण खून केल्याची माहिती दिली. ही घटना शुक्रवार दि. २० रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास निमखेडी गावात घडली. ऐन गुढीपाडवा सणाच्या दिवशी खून झाल्यामुळे गावात एकच खळबळ माजून केली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात दिपाली सोनवणे ही विवाहिता पती, तीन मले व सासूसह वास्तव्यास होती. तीचा पती हा हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. पत्नीचे गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरुन या दाम्पत्यामध्ये वाद सुरु होते. याच कारणावरुन गुरुवारी दुपारी देखील नितीन आणि दिपाली या दाम्पत्यामध्ये वाद झाला. त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की, नितीन याने पत्नी दिपाली यांच्या डोक्यात विट टाकली. त्यानंतर घरातील विळ्याने तिच्या मानेवर आणि पोटावर सपासप वार करीत तिचा निर्घण खून केला.
नितीन सोनवणे हा मुळचा यावल तालुक्यातील शिरसाट येथील वास्तव्यास असून तो दीड वर्षांपुर्वी निमखेडी येथे बहिणीच्या गावात राहण्यासाठी आला होता. याठिकाणी सोनवणे दाम्पत्य हे भाडेतत्वर घर घेवून राहत होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंधाच्या संशयावरुन त्यांच्यात वाद सुरु असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दिपाली व नितीन सोनवणे यांना तीन मुले असून ते आज गुढीपाडवा असल्यामुळे गावातच राहत असलेल्या आत्याकडे जेवणाला गेली होती. तर नितीन याची आई या घराबाहेर बसलेल्या होत्या. याचवेळी पती-पत्नीमध्ये वाद होवून त्यातून खून झाला. त्यानंतर संशयित नितीन सोनवणे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांना आपण पत्नीचा खून केल्याचे सांगितले. पत्नीचा खून केल्याचे सांगताच खात्री करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नितीन यांच्या घरात जावून पाहणी केली असता, त्यांना घरात दिपाली सोनवणे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांनी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















