
जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२५
शहरातील कलिंका माता चौक येथे सिटी स्पोर्ट्स अँड कराटे असोसिएशन जळगाव तर्फे “खानदेश चषक” 2025 राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेचे 7 डिसेंबर रविवार रोजी आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्रातून सुमारे 300 कराटे खेळाडूनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे समाजसेवक पवन कोळी, संतोष पाटील शिवसेना महानगर प्रमुख जळगांव यांच्या हस्ते कराटेचे दैवत ब्रुस ली यांच्या फोटोंचे पूजन व दिप प्रज्वलन करुन करण्यातआले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ( सिटी स्पोर्ट्स अँड कराटे असोसिएशन जळगाव चे पदाधिकारी .अजय काशीद सर . दिगंबर महाजन सर . ज्ञानेश्वर पवार.कराटे प्रशिक्षक आनंद मोरे , छोटू चौधरी, .रुपेश डोळे ,चंद्रकांत सपकाळे, योगेश भाऊ साळी उपस्थित होते या सर्वांचे स्पर्धेचे आयोजक अनंत सोनवणे , राजेश इंगळे यांच्या हस्ते पुष्गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. या स्पर्धा काता, कुमिते अशा दोन प्रकारात घेण्यात आल्या.
यास्पर्धेमध्ये संजीवनी स्पोर्ट्स असोसिएशन जळगाव व सिटी स्पोर्ट्स अँड कराटे असोसिएशन जळगांव संघटनेचे अजय काशीद सर, दिगंबर महाजन सर, ज्ञानेश्वर पवार.करिष्मा अहिरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लिला पार्क महादेव मंदिर जवळ आयोध्या नगर, आर.आर. शाळा, हरी ओम नगर जुना कानळदा रोड जळगांव या ठिकाणी चालणाऱ्या क्लासेस मधील 44 कराटे खेळाडूं सहभागी झालेले होते या स्पर्धेत विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त गोल्ड मेडल मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा खानदेश चषक सिटी स्पोर्ट्स अँड कराटे असोसिएशन जळगांव यांनी पटकावला आलेल्या सर्व खेळाडूंना मेडल देवुन गौरविण्यात आले यशस्वी सर्व खेळाडूंना सिटी स्पोर्ट्स अँड कराटे असोसिएशन चे कराटे प्रशिक्षक , जोगिंदर मौर्य , अजय काशिद,दिगंबर महाजन . ज्ञानेश्वर पवार. करिष्मा आहिरे अनमोल सहकार्य योगेश भाऊ साळी यांचे मार्गदर्शन लाभले




















