जळगाव मिरर | ७ जून २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून बस मध्ये असताना महिलांच्या सोन्याच्या दागिने लंपास केल्याच्या घटना नियमित घडत आहेत यात अजून एक भर पडली आहे भरधाव बस मध्ये बसलेल्या महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील रहिवासी असलेल्या निर्मला संजय कोणी या दिनांक ६ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौक परिसरातून ममुराबाद जाण्यासाठी बस मध्ये बसल्या होत्या या दरम्यान ममुराबाद बस स्टॅन्ड पर्यंत अनोळखी चोरट्यांनी त्यांची सोन्याची चैन 20 ग्राम वजनाची सुमारे 60 हजार रुपये किमतीची लांबविल्या प्रकरणी अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे हे तपास करीत आहे.