जळगाव मिरर | ११ मे २०२४
दोन दिवसांवर येवून ठेवलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यावर बाईक व जीप रॅली काढून मतदान जनजागृती केली.
देशभरात लोकसभा निवडणुका संपन्न होत आहेत.जळगाव लोकसभा मतदार संघात सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीने भाजपाच्या माजी आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्याच्या प्रचारार्थ केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा शिवतीर्थ मैदानात (जी. एस.ग्राउंड) पार पडली. यासभेला मतदारांनी अलोट गर्दी केली होती. यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन करण्यासाठी भव्य बाईक व जीप रॅली काढण्यात आली.
रॅली ची सुरुवात दुपारी साडे बारा वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय(जि. एम.फाउंडेशन) येथून करण्यात आली. तिथून पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,रेल्वे स्टेशन – नेहरू चौक मार्गे – टॉवर चौक – सुभाषचंद्र बोस पुतळा – सिव्हिल हॉस्पिटल कडून पुढे- पांडे डेअरी चौक पासून डी मार्ट – काव्यरत्नावली चौक मार्गे महाराणा प्रताप पुतळा – रिंग रोड – डॉ.सहस्त्रबुद्धे दवाखाना येथून – कोर्ट चौक कडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ मैदान) येथे रॅली चे विसर्जन झाले.
रॅलीत सहभागी झालेल्या शेकडो बाईक व जीप ला भाजपचे झेंडे लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती.यावेळी “अबकी बार चारसो पार”, “पुन्हा एकदा मोदी सरकार” अश्या घोषणा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. रॅलीत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
