जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२४
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. मात्र जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये केवळ तीन दिग्गज उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक उमेदवार विधानसभेच्या तयारीसाठी लागले होते त्यातील काहींना पक्षाने उमेदवारी दिली तर काहींना डावलले यात विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली महाविकास आघाडी तर्फे देखील अनेक नावांची चर्चा असताना जयश्रीताई महाजन यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी भाजप तर्फे उमेदवारी न मिळाल्याने डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर दुसरीकडे मयूर आबा कापसे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. मात्र जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार आमदार राजू मामा भोळे तर महाविकास आघाडी कडून जयश्रीताई महाजन व अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांच्यात तगडी लढत होणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.