जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२४
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथून जवळच असलेल्या राज्य मार्ग क्रमांक ४४वरील – पिंपळगाव पिंप्री येथे १७ एप्रिल रोजी सकाळी – ११ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या – आगीत ७ घरे जळून खाक झाली. तसेच गोठ्यात बांधलेल्या १६ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर घरासमोर उभ्या असलेल्या दोन – दुचाकी आगीत भस्म झाल्या असून चार बैल व दोन वासरू आगीत गंभीर जखमी झाले आहे. सुर्दैवाने या आगीत जीवीतहानी टळली.
पिंपळगाव पिंप्री येथे रामनवमी उत्सवानिमित्त सार्वजनिक महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. संपूर्ण ग्रामस्थांना महाप्रसादाचे आमंत्रण असल्याने सर्वच जण जेवणाच्या ठिकाणी जमलेले होते. अशात आग लागल्याची माहिती मिळताच सर्वांनी त्याठिकाणी धाव घेतली आणि यथाशक्ती आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. मात्र, आगीचे मोठमोठे लोळ बाहेर पडत असल्याने तसेच उन्हाचे तापमान जास्त असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे जिकरीचे झाले होते. तर या आगीत जवळपास ७ घरे संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. दरम्यान, आग नेमकी कशी लागली याची माहिती उपलब्ध झाली नाही. दरम्यान, या आगीमध्ये वासुदेव शिवलाल पाटील, ज्ञानेश्वर शिवलाल पाटील, संतोष शिवलाल पाटील, संजय हरी बेटोदे, जीवन समाधान पाटील, प्रवीण समाधान पाटील, धनराज सोनजी आहीर अशा सात कुटुंबांची घरे जळून खाक झाली आहेत. दरम्यान, फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश फड, ग्रेडेड पो. उपनिरीक्षक जयसिंग राठोड, पो.ना. दिनेश मारवडकर, तलाठी राजेंद्र सुपेकर, पशुधन विकास अधिकारी श्रीकांत व्यवहारे, भारती कुरेल तसेच निवासी नायब तहसीलदर प्रशांत निंबोळकर, अव्वल कारकून गणेश राजपूत यांनी आगग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे केले.
या आगीत अन्न-धान्य, शेतीची औजारे, कपडे, भांडी यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. रामनवमीनिमित्त निवृत्त अभियंता जे. के. चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवींद्र भंसाली, उपसरपंच आत्माराम गावंडे हे पिंपळगाव येथे उपस्थित होते. जे. के. चव्हाण यांनी तत्काळ मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच अग्नीशमन दलाची गाडी पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार जामनेर पालिकेच्या अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली