जळगाव मिरर / २३ नोव्हेंबर २०२२
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्व बाबत तुलनात्मक आक्षेपार्ह विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते . महाराष्ट्रातील समाजाच्या व जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या ह्या विधानाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे इतके मोठे दिशादर्शक पद स्वतःकडे असतांना महाराष्ट्राचे राज्यपाल अश्या पद्धतीने राज्यात अशांतता निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याने ज्यांना महाराष्ट्राची गरिमा व आदर्श व्यक्तीमत्वाची तुलना करतांना समाजाची भावनेची कदर केली जात नसेल अश्या व्यक्तीला अश्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांची महाराष्ट्र राज्यातून तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेलं असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी मनसे जिल्हा सचिव डॉ विजयानंद कुलकर्णी , जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील , मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील , किशोर पाटील , आशुतोष पाटील , दत्ता पाटील , नाना शिंदे , योगेश माळी, नितिन भोपळे , जीवन भोपळे, भूषण माळी, लोकेश महसूरकर, भूषण माळी, मनीष माळी, अतुल माळी, अंकुश पवार, संदीप मराठे , वाल्मिक कोळी , सागर जोशी , मुकेश जाधव , अनिल मोरे , जगदीश कुरकुरे , राहुल शिंदे , आशपाक देशमुख , अमोल पाटील , किरण सौदागर , अरुण भोसले , राम भोसले , अमोल पाटील , योगेश जोशी ,गोविंदा बनकर ,संदीप जोशी , लोकेश जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.