जळगाव मिरर | २० जून २०२३
सध्या घरातील प्रत्येक सदस्याकडे मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्यामुळे आर्थिक बजेट देखील वाढले आहे. तर नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जुन्या ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी जिओकडून अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात. या योजना वेगवेगळ्या वैधतेसह आणि फायद्यांसह येतात. तसंच काही प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा सुविधा देखील उपलब्ध आहेत. याशिवाय कॉलिंग आणि इतर फायदेही मिळतात. तर अशाच काही खास जिओ रिचार्जबद्दल आज जाणून घेऊ…
रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच, Dell 2 GB डेटानुसार एकूण 56 GB डेटा ऑफर केला जातो. याशिवाय कॉलिंगसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये डेली फ्री १०० एसएमएसची सुविधा देखील आहे. तसंच, या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G सेवा उपलब्ध आहे. याशिवाय Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.
Jio २९९ रुपये आणि २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुलना केली तर दोन्ही प्लॅनमध्ये अवघा ५० रुपयांचा फरक आहे. पण ५० रुपयांच्या फरकासाठी, वापरकर्त्यांना १० GB अतिरिक्त डेटासह ५ दिवसांची अतिरिक्त वैधता देखील ऑफर केली जाते. दोन्ही योजनांमध्ये इतर सर्व वैशिष्ट्ये समान आहेत. त्यामुळे दोन्ही प्लॅन बेस्ट असून आपल्या गरजेनुसार युजर्स प्लॅन घेऊ शकतात.
