
जळगाव मिरर | २३ मार्च २०२६
रविवार, २२ मार्च २०२६ रोजी के.बी.एस. समाजमंदिर येथे कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला समाजातील मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. सर्वानुमते योगेश अनिल बागडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सभेची सुरुवात सचिव राहुल नेतलेकर यांनी प्रास्ताविक करून केली. त्यानंतर त्यांनी मागील बैठकीच्या कार्यवाहीचे वाचन केले आणि संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला.
या प्रसंगी मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे यांच्यासह विजय अभंगे, नरेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, गणेश बागडे, वीर दहियेकर, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, संदीप बागडे, पंकज गागडे, राहुल दहियेकर, कार्तिक बाटूंगे, जयेश माछरे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या शेवटी विजय अभंगे यांनी आभार प्रदर्शन केले. नव्या नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश अनिल बागडे यांना शुभेच्छा देत समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा सर्वांनी संकल्प केला. सर्व उपस्थित सदस्यांनी समाजाच्या विकासासाठी आणि युवकांच्या पुढाकारासाठी उत्साहाने योगदान देण्याची तयारी दर्शविली.




















