जळगाव मिरर | २ एप्रिल २०२४
व्यवस्थापन व अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रमानांकित असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचलित जी. एच. रायसोनी इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय जळगाव येथील एमबीए विभागातील माजी विध्यार्थी करण संजय पाटील या विध्यार्थ्याची केंद्र शासनाच्या “मिनरल एक्स्प्लोरेशन एंड कंसल्टेंसी लिमिटेड” या केंद्रीय विभागात “अकाउंट ऑफिसर” पदी नियुक्ती झाली असून त्यांना १७ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे तसेच लवकरच या प्रथम श्रेणीच्या शासकीय सेवेत ते रुजू होणार असून त्यांना नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, सेमिनरी हिल्स या ठिकाणी नियुक्ती मिळाली आहे.
या अनुषंगाने करण पाटील या विध्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या वतीने जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील व प्लेसमेंट ऑफिसर तन्मय भाले यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी विध्यार्थ्याचे कौतुक करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी म्हटले कि, यशस्वी विध्यार्थ्यामुळेच महाविद्यालयाचे नाव मोठे होते तसेच शासकीय सेवेचे मनस्वी ध्येय ठेवून प्रवेशापासून अंतिम वर्षापर्यंत करण पाटील या विद्यार्थ्यांने महाविद्यालयाच्या उपलब्ध साधन सामग्रीचा, वाचन साहित्यांचा लाभ घेऊन अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले असून विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट वर्षभर विविध उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले.
तसेच प्लेसमेंट ऑफिसर तन्मय भाले यांनी सांगितले कि, शासकीय सेवेत आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता महाविद्यालयाकडून एक स्वतंत्र कक्ष कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षा साठी लागणारे अद्यावत वाचन साहित्य, योग्य वेळी मार्गदर्शन व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम हा कक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या असंख्य माजी विध्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागात सेवेची संधी मिळाली आहे व ते उच्च पदावर कार्यरत असून राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी आहेत.