जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा दूध संघाचा राजकीय वाद आता थेट पोलीसात पोहचला आहे. दि २ रोजी जळगाव शहरात असलेले जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात खडसे गट व महाजन गट आमने सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. हा वाद दिवसभर सुरु होता या वादाचा शेवट रात्री उशिरा पोलिसात पोहोचला. महाजन गटातील देशमुख यांनी खडसे गटाविरुध्य पोलिसात तक्रार दिली आहे.
मंदाकिनी एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाविरोधात प्रशासक मंडळाने जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. मंदाकिनी खडसे या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत.प्रशासकीय मंडळातील सदस्य आणि गिरीश महाजन यांचेय समर्थक अरविंद देशमुख यांनी ही तक्रार दिली आहे. संचालक मंडळ बरखास्त असतांनाही मंदाकिनी खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील ११ संचालकांनी अनधिकृत दूधसंघाच्या मिटींग हॉलमध्ये बैठक घेतल्याचे अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे, अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
