जळगाव मिरर | ५ जून २०२३
पाचोरा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस २५ वर्षीय तरुणाने पळवून नेल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारावासोबत वास्तव्यास आहे. दि २८ मार्च रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सुनील शिंदे (वय २५) याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून घेवून गेल्या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात पाचोरा पोलीस स्थानकात ४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.