
जळगाव मिरर । १० ऑक्टोबर २०२२
पारोळा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पारोळा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी असतांना घरातील सर्व सदस्य शेतात कामानिमित्त गेलेले असतांना संशयित आरोपी प्रविण पाटील(वय 28) हा दि ९ रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून घेऊन जाताना गावातील एका व्यक्तीने पाहिले असता त्या मुलीच्या काकांना फोन करून याबाबत माहिती दिली असता, त्या मुलीचे परिवार घरी येवून पाहीले मुलीचा शोध घेतला त्यानंतर संशयित आरोपीच्या घरी जावून खात्री केली संशयित आरोपीही घरी आढळून न आल्याने मुलीच्या वडिलांनी तत्काळ पारोळा पोलिसात धाव घेत संशयित आरोपी प्रविण छोटू पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास पोउनि राजु जाधव हे करीत आहेत.




















