जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२३
जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावातून एकाच वेळी दोन शाळकरी मुलींचे अनोळखी इसमाकडून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावात वास्तव्यास असलेल्या दोन अल्पवयीन मुली बुधवारी दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शाळेत जावून येतो असे सांगून गेल्या. दोघी मुली रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचा सर्वत्र शोध घेतला परंतू दोन्ही मुलींबाबत कोणतीही माहिती मिळून आली नाही. दोन्ही मुलींना काही तरी आमिष दाखवत अपहरण केल्याची तक्रार पीडित मुलींच्या नातेवाईकांनी जळगाव तालुका पोलिसात दिली. त्यानुसार गुरूवारी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.