
चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव येथील विघ्नहर्ता फाउंडेशनच्यावतीने नुकताच राजपुत मंगल कार्यालय येथे “कौतुकाची एक थाप” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पारनेरचे आमदार निलेशजी लंके यांना “कोरोनायोद्धा” आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांना “जलयोद्धा” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यांना पुष्पहार, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला. आयोजक संदीप देशमुख, सागर चौधरी सचिन चौधरी, श्री.उदय कुनबी, अरुण लोखंडे, दिपक ठाकरे, माजी जि प सदस्य किशोर पाटील मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील, तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, शाहू मराठा मंडळाचे सदस्य संजीव कापसे व अनेक राजकीय सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.