जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२४
राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून त्यासाठी निवडणूक आयोगाने आचार संहिता देखील सुरु केली आहे. मात्र हा कार्यक्रम जाहीर होण्याच्या ४५ मिनिटा आधी जळगाव शहरात तब्बल २५७ कोटी खर्च झालेल्या अमृत योजनेचे काम पूर्ण करण्यात येवून हि योजना मनपाच्या ताब्यात देण्यात आली आहे. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील तीन मंत्री असून देखील ते गैरहजर राहिल्याने शहरात मोठी चर्चा सुरु झाली आहे. हि योजना आचार संहिता सुरु होण्याच्या तासाभरापूर्वी नियोजन करत योजनेचे लोकार्पण करण्यात आले.
अमृत पाणीपुरवठा योजनेला सन २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली असून संपूर्ण शहरात ९१० किमी लांबीच्या जलवाहिनी टाकल्या आहेत. ६ नवीन जलकुंभ व २ भूमिगत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या योजनेचे काम अखेर पूर्ण झाले. या योजनेचे हस्तांतरण मनपाकडे केले असून, भविष्यात योजनेबाबत येणाऱ्या अडचणी मनपाला सोडवाव्या लागणार आहेत. दरम्यान, मंगळवारी भाऊंचे उद्यान येथील लोकार्पण सोहळ्याला खासदार स्मिता वाघ, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, माजी महापौर सीमा भोळे, महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, माजी नगरसेवक अमर जैन, अरविंद देशमुख, विशाल त्रिपाठी उपस्थित होते.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाल्याने जिल्ह्यातील तीन मंत्री आपापल्या कामात व्यस्त असल्याने या योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला दांडी मारली आहे, तर या कार्यक्रमाला शहराचे आ.राजूमामा भोळे हे देखील अनुपस्थित राहिल्याने शहरात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
लोकार्पण सोहळ्याच्या फलक चर्चेत ?
शहरातील भाऊंचे उद्यान या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम सुरु झाला होता. यावेळी लोकार्पण समारंभाच्या फलकावर खा.स्मिता वाघ, खा.रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आ.सुरेश भोळे, आ.सत्यजीत तांबे यासह शहराचे आयुक्त यांचे नावे असून यात विधान परिषद सदस्य आ.सत्यजी तांबे असे नाव लावण्यात आले असून या ठेकेदाराला किमान आमदाराचे नाव लक्षात नसेल तर इतकी मोठी योजनेचे काम नक्कीच त्यांनी यशस्वी केली असेल कि नाही यावर सध्या जळगावकर संशय घेत आहे.
सत्ताधारी पक्षाचे मोजके पदाधिकारी ?
जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असून शहरात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते छोटेसे आंदोलन असल्यास शेकडो कार्यकर्ते उपस्थित असतात मात्र या कोट्यावधीच्या योजनेच्या सोहळ्याला शहरातील भाजप पक्षातील मोजके कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.