
जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२५
गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, आर्म अॅक्टसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आणि फरार असलेला आरोपी भुसावळमध्ये लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थागुशा जळगावच्या पथकाने सापळा रचून आरोपी साहील उर्फ सलीम पठान (वय २१, रा. भाटिया गाव, हाजीपुरा, सचिन, जि. सुरत, गुजरात) याला अटक केली.
ही कारवाई आज दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११:१५ वाजता भुसावळ शहरातील नहाटा चौफुली नजीक हायवेवर करण्यात आली. आरोपीविरोधात तापी व्यारा सेशन कोर्टात सुरू असलेल्या गुन्हा क्र. ४२/२०२४ अंतर्गत भादंवि कलम ३९४, ३९७, ३४२, ३२३, ५०४(२), ३४, १२०(ब) तसेच आर्म अॅक्ट २५(१) आणि जी. पी. अॅक्ट १३५ अन्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुजरातमधील खालील पोलीस ठाण्यांमध्येही आरोपीविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे .सदर आरोपी निझर पोलीस स्टेशन, सुरत (गुजरात) यांच्या ताब्यात वैद्यकीय तपासणी करून सुपूर्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनिरीक्षक शरद बागल, श्रे. पोउनि. रवि नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकों प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे यांनी सहभाग घेतला.




















