जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२५
जळगाव तालुक्यातील वर्ल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, आमोदे (खु.) येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा आसोदेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, टिळकांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांचे राष्ट्रकार्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या प्रसिद्ध घोषणेबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून टिळकांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनीही टिळकांवरील भाषणं, गीतं आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका पूजा आसोदेकर यांच्यासह शिक्षकवृंद आणि शालेय कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
