माणूस हा नेहमी सार्वजनिक जीवनात वावरत असतांना नेहमी दोन ते तीन मित्रांसोबत किंवा कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत वावरत असतो तो येथे एकटा नसतो परंतु काही माणसं एकटं राहणं पसंद करतात त्यामुळे त्यांचे आरोग्य फारसे व्यवस्थित नसते. मागल्या दोन वर्षातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर कोरोनाची लागण झाल्याने एकटं राहाण्याची पाळी आली होती. मात्र तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासातून असं निदर्शनास आलंय की, माणसाच्या जीवनातील एकटेपणा म्हणजे हृदय संबंधित रोगांना आमंत्रण.
एकटेपणामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या (Cardiovascular Diseases) काही समस्या उद्भवू शकतात असे मत अमेरिकन हार्ट असोसिएशनने मांडले आहे. अशा वेळी सामाजिक संवाद फार महत्वाचा ठरतो. तसेच एचए (American Heart Association) च्या रिपोर्टमध्ये असेही सांगितल्या गेले आहे की, सामाजिक दूरी आणि एकटेपणा या दोन्हींचा शरीरातील रक्तवाहिन्यांवर व मेंदूवर घातक परिणाम होतो.

सामाजिक संवादाच्या अभावाने मुले डिप्रेशनच्या अभावी जातात आणि नतर त्यांना लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर आणि ग्लुकोजचे प्रमाण वाढण्यासारख्या समस्या उद्भवतात. सोशल आयसोलेशन आणि एकटेपणाचं प्रमाण १८ ते २२ वयोगतील वर्गात कॉमन दिसून येतं. तसेच वयाची पासष्टी गाठणाऱ्यांतही एकटेपणा दिसून येतो. असे लोक स्वत:ला आयसोलेट करून घेतात की यांना खरंच एकटेपणा वाटतो यावर अजूनही अभ्यास सुरू आहे.