जळगाव मिरर / ११ मार्च २०२३ ।
दिवसभर आपल्या कामासाठी मुंबईकर सकाळपासूनच निघून लोकलने आपल्या ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करीत असतात. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेत अनेक अनुभव प्रवाशांना येतात. माणूसकी, राग, भांडणं, मैत्री, प्रेम याचा अनुभव मुंबईतील चाकरमान्यांना आता सवयीचा भाग बनलाय. मात्र, अनेकदा याच लोकल प्रवासात रोमान्स आणि लव्ह बर्डचे नखरेही पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, प्रेमी कपमधील तरुणी युवकाचा किस घेताना दिसून येते. विशेष म्हणजे आपण सार्वजनिक ठिकाणी बसलो आहोत, याचेही भान या जोडप्याला राहिलेलं दिसत नाही.
मुंबईच्या लोकमध्ये अनेक सण-उत्सव साजरे होत असतात. कधी भजन गाणाी मंडळी दिसते तर कधी गाणे म्हणत प्रवाशांचं मनोरंजन करणारेही दिसून येतात. कधी सीटसाठी मारामारी असते तर कधी उतरण्यासाठीची धडपड पाहायल मिळते. याच लोकलमध्ये एका जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तरुण आणि तरुणी एकदम जवळजवळ बसले आहेत. तो तरुण मोबाईलमध्ये काही तरी पाहतोय. पण, तरुणी रोमान्सच्या मूडमध्ये दिसतेय. मुलगी त्या मुलाकडे झुकली असून त्याचा गळ्यात हात ठेवते. डब्यात त्यांचा आजूबाजूला कोणीही दिसून येत नाही, पण डब्ब्यातीलच एका प्रवाशाने दोघांचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्यामध्ये, तरुणीने तरुणाचा किस घेतला असून मुलाच्या हातात मोबाईल दिसून येतोय. दरम्यान, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
