जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुरत रेल्वे गार्डन, दुध फेडरेशन जवळ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वा. आयोजित या कार्यक्रमात विविध संस्था, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. नालंदा बुद्ध विहार समिती, पंचशिला महिला विकास संस्था शिवम सोनवणे, मेघना सोनवणे तसेच परिसरातील नागरीकांनी सामूहिकरित्या सहभागी होत महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधले.
या वेळी अनिल अडकमोल, राजू निकम, दीपक माने, दिलीप पोकळे, कुंदन निकम, आनंद सपकाळे, योगेश निंबाळकर, निलेश जाधव, गणेश फेगडे, सचिन सुरवाडे, विजय सुरवाडे, मुकेश जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
नालंदा बुद्ध विहार मिज परिवार, नालंदा बुद्ध विहार समिती व पंचशिला महिला विकास संस्थेचे पदाधिकारी कार्यक्रमाचे आयोजक म्हणून पुढाकार घेत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा उपक्रम राबविला. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा समाजहितासाठी अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.




















