जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जळगाव तालुका उपाध्यक्ष पदी आकाश सोनार, नरेश चनाल, सहसचिव विजय गवळी, भडगाव तालुका सचिव पुष्कराज पाटील,जळगाव शहर संघटक मंगेश पाटील, शहर उपाध्यक्ष समाधान न्हावी यांच्या नियुक्त्या राज्यसचिव मा.अमोल भिसे साहेब ,संस्थापक मनसे वृत्तांत मारुती दुनगे जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आल्या.
महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यांना सरकारतर्फे भरपाई मिळण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी यांनी सहकार्य करावे. प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांसोबत बैठक नियोजित करावी शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सर्व जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी यांना तसे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव श्री अमोल भिसे यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांना शेती सोबत जोड व्यवसायाबद्दल योग्य माहिती द्यावी. या व्यवसायाला मिळणारी मार्केट व्यवस्था किती आहे हे लक्षात आणून द्यावे शेतकऱ्यांच्या मालाला एक्सपोर्ट क्वालिटीचा तयार करण्यासठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावे असे मार्गदर्शन मारुती दुनगे यांनी केले.
शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत कोणत्याही अडचणी निर्माण होत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा. प्रत्येक तालुक्यात कृषी अवजारे शेतकऱ्यांसाठी नाममात्र दरात उपलब्ध करून देऊ असे आव्हान जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमीन देशपांडे यांनी केले.
या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, बंटी शर्मा,जिल्हा सचिव अमोल पाटील तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील विनोद पाटील तालुका उपाध्यक्ष किशोर वाघ विलास सोनार संदीप मांडोळे, सचिन पवार, राहुल चव्हाण, दिपक राठोड, भुषण ठाकुर,अनिता कापुरे, लक्ष्मी भिल इत्यादी या बैठकीसाठी उपस्थित होते.