जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२५
शहरातील रामेश्वर कॉलनी, मेहरुण येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या या उत्सवात कॉलनीतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. उत्सवाच्या आयोजनात स्थानिक रहिवाशांनी आपले मोलाचे योगदान दिले.
या वर्षीचा महोत्सव रामेश्वर कॉलनी वाल्मिकी जयंती महोत्सव समितीच्या नेतृत्वाखाली पार पडला. अश्विन सोनवणे, राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे, समाधान सोनवणे, निवृत्ती कोळी, बुरा कोळी, योगेश कोळी, अभिमान कोळी, लालाशेठ कोळी, रामा काळी, यशवंत पाटील, हेमंत पाटील, उमेश चौधरी आणि आबा चौधरी यांचा आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी सामूहिक प्रयत्नातून जयंती कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी “विचार वारसा फाउंडेशन”चे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी विशेष सहकार्य केले. तसेच MIDC पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोलाची साथ दिली. दुध विकास महासंघाचे संचालक अरविंद देशमुख यांचेही कार्यक्रमात अनमोल सहकार्य लाभले. महर्षी वाल्मिकी यांच्या कार्याचे स्मरण करत, त्यांचा संदेश समाजात पोहचवण्याचा प्रयत्न या उत्सवातून करण्यात आला. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि समता या मूल्यांना उजाळा देणारा हा कार्यक्रम होता. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले.