
जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेतर्फे माहेश्वरी समाजात दरवर्षी जे लोक उल्लेखनीय कार्य तन-मन-धनाने आणि विशेष कार्य करतात त्यांचा सत्कार केला जातो.
परंतु मागील दोन वर्ष लाॅक डाऊन असल्याने हा कार्यक्रम होऊ शकला नाही यावर्षी हा सत्कार सोहळा दिनांक १७ आणि १८ सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथे संपन्न झाला या सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश सभेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर देशातून विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव येथील प्रसिद्ध अॅडव्होकेट आणि समाजसेवी आणि जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष श्री नारायण रामदयाल लाठी यांचे उल्लेखनीय कार्य आणि ज्यांनी जळगाव जिल्ह्यात माहेश्वरी समाजात 120 घराचं जागेसहित बनवून देण्याचा संकल्प असून त्याबरोबर माहेश्वरी समाजात कोणी बेघर राहू नये ही त्यांची संकल्पना आणि महेश भवन स्थापनेचा संकल्प असून ते येतील बालाजी मंदिर संस्थांचे ट्रस्ट पण आहेत ते बालाजी मंदिर भवन निर्माण चा मानस आहे, रिंग रोड येथील महेश भवन याच्यात ते कार्यकारी संचालक असून, लोहन माता लाठी कुलस्वामिनी ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत. त्याच्याबरोबर त्यांचे विविध उल्लेखनीय कार्य ची दखल माहेश्वरी महाराष्ट्र प्रदेश सभेने नोंद घेऊन त्यांना विशेष सन्मान पत्र जाहीर केले.
हा सन्मान अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्यामसुंदर सोनी आणि विविध पदाधिकारी यावेळी महामंत्री संदीप काबरा, प्रदेशाध्यक्ष किसन भंसाली, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांचे बरोबर विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याबरोबरच माहेश्वरी समाजाच्या माध्यमातून होणाऱ्या समाजसेवा कार्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी सुयोग या स्मरणिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले
अॅडव्होकेट नारायण रामदयाल लाठी यांच्या सत्कार बरोबर राज्यातील विविध क्षेत्रातील माहेश्वरी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात जालन्याचे श्री विजय जी राठी, कोल्हापूर ग्रामीण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मनोज लोहीया, तळेगाव येथील डॉक्टर शालिग्राम जी भंडारी, जळगाव येथील श्री कौशिक बंग, देवेश भैय्या, संगीताजी बियाणी, सुधाजीजी काबरा यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे विविध पदाधिकारी श्री केदारजी मुंदड़ा, मोतीलालजी झंवर, संजयजी दहाड, मनीष झंवर, अॅडव्होकेट राजेंद्र झंवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.




















