जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२४
जळगाव तालुक्यातील जि.प. शाळा ममुराबाद येथे “निपुण भारत अंतर्गत” वर्ग पाहणी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेने तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी श्री.खलील शेख यांच्या आदेशान्वये बाला उपक्रमांतर्गत शाळा पाहणी करण्यासाठी केंद्रप्रमुख श्रीमती वैशाली बाविस्कर व विषयसाधनव्यक्ती श्रीमती सुचिता मोतीखाये या जि.प. शाळा ममुराबाद येथे गेल्या असता तेथे अद्वितीय असा अनुभव आला. “निपुण भारत अंतर्गत” वर्ग पाहणी करतांना विद्यार्थी प्रतीसाद चांगला मिळाला.
“बाला उपक्रमांतर्गत” असलेल्या 43 मुद्द्यांपैकी शाळेने 19 मुद्यांची पुर्तता केलेली दिसुन आली. सममित आकार खिडकीवर रंगवून विद्यार्थ्यांना ते आकार ज्योती मॅडम यांनी समर्पक भाषेत समजविले, तसेच स्वाती पाटील मॅडम यांच्या वर्गातील इ. 1 ली च्या विद्यार्थ्यांनी “माझा परिचय” अतिशय स्पष्टपणे दिला. श्रीमती कल्पना चौधरी मॅडम यांच्या इ. 2 री च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी Learning Song (शिकण्याचे गाणे – मी स्वतः शिकणार आहे Peer learning, Peer learning करणार आहे.) हे अगदी उत्कृष्ट रीत्या सादर केले. तसेच अध्ययन प्रक्रीयेचे व्यवस्थापन व मुल्यमापन या प्रशिक्षणामधील Selfy with success मध्ये इंग्रजी भाषेतील S अक्षरापासून जास्तीत जास्त स्पेलिंग लिहीणारे यशस्वी विद्यार्थी हिमांगी गोकुळ कुंभार व हर्षु राहूल पाटील यांच्या सोबत श्रीमती वैशाली बाविस्कर व श्रीमती सुचिता मोतीखाये यांनी Selfy काढला. बाला उपक्रमांतर्गत शाळा पाहणी करताना लागणारी शाळेची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरती चौधरी व सर्व शिक्षिका यांनी उपलब्ध करून दिली.