जळगाव मिरर । ३ डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील बालगंधर्व सभागृहात मनोज जरांगे पाटील हे व्यासपिठावर येताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व बळीराजाचे प्रतिक असलेले नागराची देखील पुजा केली. तर व्यासपिठावर केवळ एकच खुर्ची ठेवण्यात आलेली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत वेदांत संतोष पाटील, माही राम पाटील, राजनंदन पाटील, साहील गोपाल दर्जी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा देवून सन्मान देखील करण्यात आला. सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांना ‘मराठा योध्दा सन्मान पत्र’ देण्यात आले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळविण्याच्या मागणीसाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील हे सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात दौरा करीत असताना जळगावात देखील त्यांचा दौरा असल्याने आज जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज चाळीसगावात सकाळी तर दुपारी अमळनेर, धरणगाव व सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगावात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील बालगंधर्व सभागृहात त्यांची जोरदार सभा देखील सुरु झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव बालगंधर्व सभागृहात दाखल झाले होते. यावेळी महाराजांच्या पोवाडे देखील आयोजकांतर्फे सादर करण्यात आले. मनोज जरांगे पाटील बालगंधर्व सभागृहात रात्री ९.१० मिनिटांनी आगमन झाले यावेळी ‘एक मराठा कोट मराठा’ घोषणा देण्यात आल्या.
जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉपजवळ मनोज जरांगे यांचे फुलाची उधळण करीत स्वागत समाजबांधवानी तर त्यानंतर पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकारवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरातील कोर्ट चौक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर देखील मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तर शहरात आज भगवेमय वातावरण देखील झाले होते तर प्रत्येक ठिकाणी त्यांचे जेसीबीतुन फुलांद्वारे उधळण करीत स्वागत करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्यावर ठीक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. जळगाव शहरातील मुख्य परिसरातील बालगंधर्व सभागृहात सभा सुरु झाल्यानंतर सभागृह भरगच्च भरले होते तर अनेक समाज बांधवानी सभागृहाच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी तरुणांचा हाती भगवे घेऊन मोठा सहभाग होता.
मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणासाठी लढत आहोत. ही लढाई बघण्यासाठी सात पिढ्या घातल्या. समाजाला न्याय मिळवून द्यायचा तोपर्यंत माघार घ्यायची नाही, जळगाव जिल्ह्याची एकी बघून आनंद होतोय. धरणगाव ते जळगाव यादरम्यान सर्वच मराठे एकत्र आले. मराठा एकत्र येत नाही, आम्हाला बदनाम करायचा आणि खचवायच. हे षडयंत्र समाजाने एकत्र येवून ताकद दाखविली. सर्वांचे धाबे दणाणले आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही म्हणून येवल्याचे मागे पडले आहे. बाकी कुणाला दोष द्यायचा नाही. बाकीच्यांना नाईलाजास्तव त्यांच्यासोबत आहेत. बाकीचे सर्व ओबीसी आपल्या सोबत आहेत. हे जर सिध्द करायचे असेल तर अंबडची सभा झाल्यावर मुंबई जाईपर्यंत त्यांचे 4 जण फुटले. तरी सुध्दा त्यांचे डोके ठीकाणावर येत नाही. आपण 35 वर्षांचा अनुभव घेतलेला तरी सुध्दा मराठा समाज बाजूला का चालले याचा अभ्यासच करत नाही. इतका मोठा मंत्री असल्यावर सुध्दा डोक लावत नाही. 35 ते 40 वर्ष प्रशासनाचा अनुभव घेतल्यावर सुध्दा जातीयवादावर बोलू नये, अशी काय गनीमा संपते, कायद्याच्या पदावर बसलेल्या मानसाने काय बोलले पाहिजे याचे भान असले पाहिजे. मंत्री पदाची शपथ घ्यायची आणि जाती जातीत भांडण लावायची कामे केली. याने एकट्याने महापुरुषांच्या जाती काढल्या. इतका गेलेला मंत्री मी आयुष्यात बघितला नाही अन मला म्हणतो पाचवी शिकला आहे. आम्ही शांत होतो आम्हाला डिवचायची गरज नव्हती. मी कोपऱ्याला खुप भिंतो लई मंत्री मागे लागले होते कोपऱ्यात येत. पण मी मराठ्यांशी प्रामाणिक आहे. मी किती शिकलो आहे हे बघण्यासाठी सरकारने तीन दिवस घेतले. मी तर 12 वी पास निघालो. माझ्या जातीला कसा न्याय द्यायचा ते मी बघतो.
आतापर्यंत 32 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले की नाही, 24 तारखेनंतर राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळवून देतो तुला काय करायचे ते कर, 70 वर्षापूर्वी मराठ्यांच्या नोंदी होत्या पण त्यांनी त्यांच्या बुडाखाली लपवून ठेवल्या होत्या अन मराठ्यांच्या विश्वासघात झाला. 1905 ते 1967 ते 2023 पर्यंत सरकारने पुरावे शोधण्यास सुरुवात केली अन नोंदी सापडल्या.
सविस्तर बातमी अपडेट होत आहे