जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२६
एकाच घरातील दोघ बहिणींचे प्रत्येकी १ लाख ७० हजार रुपये घेवून लक्ष्मण राजेंद्र भदाणे (वय २८, रा. सितासोनू नगर) व त्याचा मित्र गणेश नथ्थू काथार यांच्यासोबत लग्न लावले. परंतू त्या दोघ नववधू माहेरी गेल्या त्या परल्याच नसल्याची घटना उघडकीस आली आहे. पैसे घेवून लग्न लावून देणाऱ्या महिलेसह नववधी व तिच्या कुटुंबियांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सोनूसीता नगरातील लक्ष्मण भदाणे या तरुणाच्या लग्नासाठी कुटुंब मुलीच्या शोधात होते. यावेळी त्यांच्या कॉलनीजवळ राहणारी मनिषा संजय जैन ही महिलेने पालघर येथील स्थळ आणले होते. लग्ग्राकरीता मुलीच्या कुटुंबियांना १ लाख ७० हजार रुपये देण्याबाबत ठरले होते. त्यानुसार दि. २७ नोव्हेंबर रोजी मनिषा जैन ही कविता कन्हैयालाल पटेल हीच्यासह तिचे आई, वडील, बहिण सविता, पुनम वर्मा नावाची आत्या आणि राणीताई किन्नर यांना घेवून भदाणे यांच्या घरी आले. मुलगी पसंत पडल्यानंतर त्याच दिवशी नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावून दिला, आणि मनिषा जैन व राणीताई किन्नर यांच्या मार्फत भदाणे यांनी मुलीच्या कुटुंबियांना पैसे दिले होते.
लग्रानंतर कविता हीच्या आईवडीलांनी कविताला पालघर येथे नेतो. तुम्ही दोन चार दिवसांनतर तीला घेण्यास या असे म्हणत ते सोबत घेवून गेले. त्यानंतर दि. ३ जानेवारी रोजी लक्ष्मण भदाणे हा मित्र गणेश काथार व त्याची पत्नी सविता हे पालघर येथे गेले. कविताच्या वडीलांनी स्टेशनबाहेर विनाकारण त्यांच्यासोबत वाद घातला आणि गणेशची पत्नी सविता हीला घेवून जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यानंतर त्यांना गुजरात मधील वाघाबारी फडवेल रोड येथील एका शेतात नेले.
दोघांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर ते जळगावला परतले. त्यांनी घडलेली घटना कुटुंबियांसह लग्न जुळविण्यासाठी पैसे घेणाऱ्या मनिषा जैन हीला सांगितली. तीने आठ दिवसात मुलगी परत येईल असे सांगितले. परंतू अद्यापर्यंत त्या नववधू परत आल्या नसून त्या दोघ तरुणांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित मनिषा संजय जैन (रा. राजाराम नगर समोर), नववधू कविता कन्हैयालाल पटेल, सविता कन्हैयालाल पटेल, त्यांची यथाकथीत आई वडील, राणी ताई (सर्व रा. चाळ, काटकर पाडा, गणेश नगर, शिगाव, पालघर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण भदाणे यांच्या घरासमोर राहणारा त्याचा मित्र गणेश काथार याची मनिषा जैन याच्यासह भदाणे याच्या सासरच्यांच्यासोबत ओळख झाली. तो देखील लग्ग्राकरीता मुलगी शोधत असल्याने त्याचे भदाणे याच्या पत्नीची बहिण सविता पटेल हीच्यासोबत लग्नाबाबत ठरून त्या मोबदल्यात त्यांना १ लाख ७० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर दि. २६ डिसेंबर रोजी गणेश काथार याचे लग्न लावून दिले.




















