जळगाव मिरर | १९ मार्च २०२५
राज्यात मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून आता पुणे शहरातील हिंजवडी परिसरात एका मिनी बसला आग लागल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर भाजलेत. हिंजवडी पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी या भीषण अपघाताची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला ही आग लागली. यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण जखमी आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. या बसमध्ये एकूण 12 कामगार होते. मात्र, मागचा दरवाजा न उघडल्याने ही चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये टेम्पोला भीषण आग लागल्याची ही घटना घडली. यामध्ये गाडीचा दरवाजा वेळेत न उघडल्याने चार कर्मचाऱ्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची तर दोनजण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पोमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
संबंधित चौघे ही हिंजवडीमधील खासगी कंपनीचे कर्मचारी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्याने संबंधित भीषण घटना घडली.
हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीत फेज 1 रोडवर ही घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बसला अचानक ही भीषण आग लागली होती. सदर आगीत टेम्पोमधील एकूण 12 प्रवासी पैकी 4 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. जखमींवर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.