
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरूण परिसरातील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ.सुनिल महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे “पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे औचित्य साधुन…महापौरांचा एकच ध्यास पर्यावरणाचा टाळुया -हास या घोषवाक्या सह परिसरात पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
यावेळी शाळेच्या विद्यार्थानी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी शहराच्या महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते गणपती स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी विद्यार्थी व पालक यांनी परिश्रम घेतले.




















