जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरातील मेहरून तलावानजीक असलेल्या जॉगिंग ट्रक वर नेहमीच सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी गर्दी झालेली असते याच ठिकाणी एका २३ वर्षीय तरुणास अपघात केल्याच्या कारणावरून मारहाण करीत २७ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरात दरमहिन्याला अशा घटना घडत असतात व लागलीच पोलीस आरोपींना बेड्या देखील ठोकत असतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील मेहरून तलावा नजीक जॉगिंग ट्रॅकवर दिनांक १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास २३ वर्षीय तरुण तारीक खाटीक हा या ठिकाणी दुचाकीवर जात असताना दुसऱ्या दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण येत दुचाकीच्या मागील बाजूस ठोस मारून अपघात झाल्याच्या कारणांनी तरुणाशी भांडण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या तरुणास या अनोळखी दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या जवळील मोबाईल फोन ब्लूटूथ सोनाटा कंपनीचे मनगटी घड्याळ असा एकूण २७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला असून याप्रकरणी तारीख खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात दोन अनोळखी तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.