
जळगाव मिरर । ११ डिसेंबर २०२२
संभाजी ब्रिगेड रोप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या नियोजना संदर्भात आज पद्मालय शासकीय विश्रामगृह जळगाव येथे बैठक पार पडली.
या बैठकीत काही नवीन पद नियुक्ती करण्यात आल्या राजेश विश्वासराव पाटील – महानगर उपाध्यक्ष , माधुरी दिलीप उमाळे – महानगर सचिव , नंदकिशोर प्रल्हाद साठे – महानगर संघटक तसेच २८ डिसेंबर रोजी पुणे येथे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या अधिवेशन कार्यक्रमा संदर्भात नियोजन करण्यात आले.
तरुणांना राजकारण व समाजकारण यांच्या यांच्या गुंतून न पडता आर्थिक सक्षमीकरणाकडे घेऊन जाणारी संभाजी ब्रिगेड हे जगातील एकमेव संघटन आहे या अधिवेशनासाठी जिल्ह्यातून हजारो शिव प्रेमी कार्यकर्ते जाणार असून या बैठकीत जिल्हाध्यक्ष तुषार सावंत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महानगराध्यक्ष – संदीप पाटील , महानगर उपाध्यक्ष – सतीश लाठी , उपमहानगरध्यक्ष – मायाताई पवार , संदीप मांडोळे , संदीप पाटील ,अविनाश पाटील , गोपाल पाटील,राजेंद्र पाटील , प्रफुल पाटील , भरत पाटील, प्रमोद कुंभार , मयूर चौधरी,राकेश जैन,बाळू पाटील , कौस्तुभ पाटील, सागर कोळी , दीपक तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




















