
जळगाव मिरर । ३ जानेवारी २०२३
हिवाळी अधिवेशन आटोपल्या नंतर राज्यातील मंत्री आप-आपल्या जिल्ह्यात येत शासकीय कामकाजाचा आढावा घेत असल्याचे राज्यात दिसून आले तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकसभेच्या युती बाबत मोठे विधान केले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, भाजपचं लोकसभा मिशन या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. यामध्ये युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील तर ‘भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहे. तेव्हा या युतीमध्ये नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे’ असे गुलाबराव यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपच्या लोकसभा मिश वरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. याबद्दल गुलाबराव पाटलांना विचारले असता संजय राऊत यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही. कुणीतरी मागच्या दरवाज्याने येणाऱ्या माणसाने हे म्हणावं आणि त्याला आपण मान्यता द्यावी, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली.




















