
जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटनेत नेहमीच वाढ होत असतांना एक धक्कादायक प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातून समोर आले आहे. चक्क एका अल्पवयीन मुला-मुलीच्या कृत्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका घरात राहणाऱ्या समवयस्कर अल्पवयीन मुला- मुलीने व्हिडीओ पाहून संबंध ठेवले. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. कुटुंबातील कोणालाच साधा संशय आला नाही. मात्र, अचानक मुलीचे पोट दुखू लागले. सोनोग्राफी केली तेव्हा धक्कादायक प्रकार पुढे आला. मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. हे रिपोर्ट पाहून संपूर्ण कुटुंबच हादरून गेले. शिक्षणासाठी आत्याकडेच मामे भाऊ राहत होता. त्याच्यासोबतच आत्याची मुलगी नेहमी खेळत बागडत असे. दररोज शाळेत जाणे घरी आल्यानंतर अभ्यास करणे, असा नित्यक्रम सुरू होता. अचानक मुलीला उलट्या-मळमळ होऊ लागली. हा त्रास वाढत गेल्याने अखेर सोनोग्राफी केली असता मुलगी गरोदर असल्याचे पुढे आल मुलीला आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीच्या तक्रारीवरून अल्पवयीन मामे भाव विरोधात गुन्हा दाखल केला आहे